सिंधुदुर्ग: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, रील्स व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून तो कोकणातील प्रसिद्ध आंबोली घाटातील आहे. निसर्गसौंदर्य, धबधबे आणि धुके यासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटात सध्या वर्षा पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी आंबोलीमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये कर्नाटकातील काही तरुण धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्या थांबवून जोरजोरात हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध उभे राहून नाचणे, जोरात आरडाओरडा करणे आणि सार्वजनिक शिस्तभंग करणारे प्रकार करताना ही मंडळी दिसत आहेत. या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या घटनांमुळे आंबोलीच्या नैसर्गिक सौंदर्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. आंबोली घाट हा जैवविविधतेने समृद्ध असलेला आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा परिसर आहे. त्यामुळे येथे होणारी अशी हुल्लडबाजी केवळ सामाजिकदृष्ट्याच नव्हे तर पर्यावरणीय दृष्ट्याही चिंतेची बाब मानली जात आहे.
दुसरीकडे, पोलिस (Police) आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून पर्यटन स्थळांवर कडक नियम आणि अंमलबजावणीची मागणीही स्थानिकांकडून होत आहे. दरवर्षी अशा घटना घडत असूनही प्रशासनाकडून पुरेसे नियंत्रण न ठेवता आल्याची टीकाही होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी अशा वर्तनाचा निषेध व्यक्त करत प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पर्यटकांनी आनंद घेणे हे स्वाभाविक आहे, पण सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळणे देखील तितकेच गरजेचे आहे, हे विसरु नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.