Sanjay Raut Arrested: मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काल शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना अटक केली. त्याचवेळी त्यांच्या अटकेवर भाजप नेते राम कदम यांची प्रतिक्रिया आली असून, 'ही दैवी शिक्षा आहे', असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजप (BJP) नेते राम कदम यांनी आज ट्विटमध्ये म्हटले की, "उखाड दिया.. हे कोणी सांगितले, कोणाला? ही दैवी शिक्षा आहे. ही भारताच्या नव्या बदललेल्या कायद्यांची आणि मजबूत लोकशाहीची ताकद आहे."
दुसरीकडे, 60 वर्षीय राऊत यांना सहा तासांहून अधिक चौकशीनंतर रविवारी मध्यरात्री ईडीने (ED) अटक केली. यावेळी अधिकार्यांनी दावा केला की, राऊत तपासात सहकार्य करत नव्हते, त्यामुळे त्यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत 12:05 वाजता ताब्यात घेण्यात आले.
तसेच, शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहे. जिथे अंमलबजावणी संचालनालय त्यांच्या कोठडीची मागणी करेल. खरे तर, एजन्सीचे एक पथक रविवारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तिथे त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्यांना एजन्सीच्या स्थानिक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. झडतीदरम्यान, पथकाने 11.5 लाख रुपयांची रोकडही जप्त केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.