Nagpur IPL Betting Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

क्रिकेट बुकीने नागपुरातील व्यावसायिकाला घातला 58 कोटींचा गंडा; पोलीस येण्यापूर्वी दुबईला झाला फरार

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रात एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीचा पर्दाफाश झाला आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीने नागपुरातील एका व्यावसायिकाला बनावट बेटिंग अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. मात्र यात व्यावसायिकाची 58 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

नागपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी महाराष्ट्रातील गोंदिया येथील आरोपीच्या घरावर छापा टाकला.

क्रिकेट बुकी अनंत नवरतन महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असून, आरोपी घरातून फरार झाला असून, पोलिसांना त्याच्या घरी 17 कोटींहून अधिक रोकड सापडली आहे. याशिवाय 14 किलो सोने आणि 200 किलोहून अधिक चांदी सापडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला मात्र, तो आधीच दुबईला पळून गेला होता.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट बुकीने या व्यावसायिकाला ऑनलाइन जुगार आणि इतर गोष्टींमधून पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. बुकीने ऑनलाइन जुगार खाते उघडण्यासाठी व्यावसायिकाला व्हॉट्सअ‍ॅपवर लिंक दिली. त्यानंतर त्या लिंकवर जाऊन व्यापाऱ्याने आपले खाते तयार करून जुगार खेळण्यास सुरुवात केली.

बुकीच्या आमिषाला बळी पडून व्यापारी त्याच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर व्यावसायिकाने हवाला एजंटमार्फत बुकीला आठ लाख रुपये पाठवून जुगार खेळण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त म्हणाले की, व्यावसायिकाचे 58 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे जाणवले. व्यावसायिकाने फक्त 5 कोटी जिंकले होते आणि 58 कोटी गमावले.

व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर बुकीविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा बुकी दुबईला पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT