Samrudhi Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते होणार लोकार्पण

दैनिक गोमन्तक

मुंबई : नागपुर ते मुंबई दरम्यानचा प्रवास 16 तासवरुन 8 तासपर्यंत कमी करणारा समृद्धी महामार्गाचा उद्धाटनाचा मुहूर्त ठरला असुन हे उद्धाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 2 मे रोजी याचं लोकार्पण होणार असल्याची माहीती समोर आली आहे. हा महामार्ग महाराष्ट्रांमधील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणारा द्रुतगती मार्ग असणार आहे. या पैकी पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा 240 किमीचा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार आहे. [It was the moment of inauguration of Samrudhi Highway]

26 टोलनाक्यांवरील टोलवसुलीसाठीची निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रद्द करण्यात आली होती ही निविदा रद्द केल्यानंतर गुरुवारी टोलवसुलीसाठी नव्याने निविदा मागविण्यात आली होती. त्यामुळे 2 मे रोजी होणारे नागपूर ते शेलू बाजार, वाशीम अशा 210 किमीच्या मार्गाचे उद्घाटन अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत होती.

समृद्धी महामार्गाचे काम 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे. असे असताना नागपूर ते सेलू बाजार, वाशीम या 210 किमीच्या टप्प्यातील 100 टक्के काम पूर्ण झालं आहे. निविदा सादर करण्यासाठी 25 एप्रिल अंतिम तारीख असून 2 मे पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून टोल यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण कऱण्याचं आव्हान सध्या आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हे 700 किमी अंतर केवळ सात तासांमध्ये पार करता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या... वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 ज्येष्ठांचा होरपळून दुर्देवी मृत्यू; रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु Watch Video

Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

SCROLL FOR NEXT