Bacchu Kadu Dainik Gomantak
महाराष्ट्र

आरोप खरे ठरले तर स्वत:चे हात कलम करेन -बच्चू कडू

समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी यावर भाष्य केले आहे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

रस्ते कामात अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात (Court) दाखल केलेल्या याचिकेनंतर अखेर राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वंचितने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. (Bacchu Kadu Updates)

जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जि.प.कडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलांसाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार 10 मार्च 2021 रोजी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव समितीकडे देखील पाठविण्यात आला होता. मात्र, जि.प.च्या या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल केले गेले आहेत. अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर पालकमंत्री कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी स्वत:कडे वळविला. शासनाच्या 1 कोटी 95 लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र देखील तयार करण्यात आले, अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीने 3 डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिसांकडे नोंदवली होती.

परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे वंचित तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 153 (3) अंतर्गत याचिका न्यायालयात दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी भादंवि कलम 405 (फौजदारीपात्र न्यासभंग, 409, लोकसेवकाने फसवणूक करणे), 420 (फसवणूक), 468 (खोटे कागदपत्रे तयार करणे), 471 (खोट्या कागदपत्रांचा वापर करणे) नुसार गुन्हा दाखल केला होता. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी फौजदारी संहिता प्रकिया 156 (3) च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

‘कामात कुठेही अनियमितता नाही’

हा चुकीचा निर्णय आहे, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागणार आहोत, असेही स्पष्ट करीत ‘या प्रकरणात आपण दोषी आढळलो तर वंचितच्या कुठल्याही नेत्यांच्या समोर स्वतःचे हात कलम करेन’, असा पुनरुच्चार पालकमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी यावर भाष्य केले आहे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT