Chief Minister Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Development: तरुणांच्या हाताला काम, गुंतवणूक अन् विकासाला चालना देतयं महायुती सरकार! जाणून घ्या

Maharashtra Assembly Elections: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.

Manish Jadhav

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यातील राजकीय फाइट जोरदार होणार हे आता नक्की होऊ लागलं आहे. विविध राजकीय मुद्यांवरुन महाविकास आघाडी महायुती सरकारला घेरत आहे. त्याचवेळी, महाविकास आघाडीकडून समाजात फूट पाडणारी व्यक्तव्ये केली जातायेत. याउलट, महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहे. महायुती सरकारच्या “महाराष्ट्र फर्स्ट, मराठी फर्स्ट” या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, राज्यातील हाय प्रोफाइल प्रकल्पांना मोदी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहे.

ऊर्जा क्षेत्रातील क्रांती

पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी राखीव ₹2.14 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्र मोठ्या परिवर्तनासाठी सज्ज आहे. या प्रकल्पामुळे 72,000 नवीन नोकऱ्यांची निर्मिती करताना अतिरिक्त 40,870 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे. नुकतेच, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला आणखी चालना देण्यासाठी महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली.

वाहन आणि ऊर्जा क्षेत्रातील मोठी गुंतवणूक

वाहन आणि ऊर्जा या दोन्ही क्षेत्रांसाठी ₹1.20 लाख कोटींची गुंतवणूक मंजूर करण्यात आली आहे. अदानी ग्रुपच्या सहकार्यातून तळोजा, पनवेल येथे सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून 5,000 नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, टोयोटा किर्लोस्करच्या ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक वाहन प्लांट उभारण्याच्या निर्णयाने अंदाजे 9,000 नोकऱ्या निर्माण होतील.

उत्तर महाराष्ट्रात रेल्वेचं जाळ विस्तारलं जातयं

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोदी सरकारने मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी ₹18,000 कोटी मंजूर केले आहेत, ज्यामुळे 30 नवीन स्थानके सुरु होतील. हा प्रकल्प 1,000 हून अधिक गावे आणि 3 दशलक्षाहूंन अधिक लोकसंख्येला विस्तृत रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी सज्ज आहे. या रेल्वे सेवांच्या विस्तारामुळे ऐतिहासिकदृष्ट्या अविकसित प्रदेशांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशी शक्यता आहे.

जल व्यवस्थापन आणि सिंचन: उत्तर महाराष्ट्रासाठी जीवनरेखा

आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ₹7,000 कोटी रुपयांचा नार-पार गिरण नदी जोड, ज्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. गुजरातमधील अतिरिक्त पाणी महाराष्ट्रात वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, जळगाव आणि धुळे येथील 50,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, ज्यामुळे या जिल्ह्यांतील कृषी उत्पादनाला मोठा फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT