Honor killing in Maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Honor killing धक्कादायक..मुलगी घराबाहेर राहिली म्हणुन वडील, चुलत्याने दिली भयंकर शिक्षा

मुलगी तीन दिवस घराबाहेर राहिली म्हणुन जालन्यात वडील आणि चुलत्याने तिला भयंकर शिक्षा दिली

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्र ऑनर किलींगच्या घटनेने पुन्हा एकदा हादरला आहे. जालन्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा ऑनर किलींगचा भयाण चेहरा समोर आला आहे. आपली मुलगी तीन दिवस घरबाहेर राहिल्याने आपली अब्रु गेली अशा समजुतीतुन वडील आणि चुलत्याने मुलीला झाडाला लटकावुन फाशी दिल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे.

या घटनेनं जालना जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी मृत तरुणीच्या वडिलांसह काकांना अटक केली आहे.

या तरुणीचे नात्यातल्याच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आपल्या प्रियकरासोबत ती तीन दिवस घराबाहेर राहिली होती. त्यामुळे समाजात आपली बदनामी झाली या रागातुन तरुणीचे वडील आणि काकांनी तिला झाडाला लटकावुन तीचा खुन केला.

ही हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न कुटूंबियांनी केला. अंत्यविधी करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला पण गावात या प्रकरणाची चर्चा झाली आणि सत्य बाहेर आलं.

कौंटुबिक मुल्यांना पायदळी तुडवणारी आणि माणुसकीवर प्रश्नचिह्न निर्माण करणारी ही घटना जालना जिल्ह्यातील पिरपिंपळगाव इथं घडली आहे. संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी या प्रकरणातील संशयितांनी नावं आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू अखेर पोलिसांच्या ताब्यात! मोपा विमानतळावरून थेट वैद्यकीय तपासणीसाठी

SCROLL FOR NEXT