Maharashtra government Dainik Gomantak
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा दणका; 'त्या' कामांना स्थगिती न देण्याचे आदेश

विकासकामांना स्थगिती व विकासकामे रद्दच्या शिंदे- फडणवीस सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती व विकासकामे रद्दच्या शिंदे- फडणवीस सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महाराष्ट्रात चार महिन्यापूर्वी झालेल्या सत्ताबदलानंतर शिंदे -फडणवीस सरकारने विकासकामांना स्थगिती व विकासकामे रद्दचे आदेश काढले होते. याबाबतची पुढील सुनावणी सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी होणार आहे. आजरा तालुक्यातील बालेवाडी ग्रामपंचायतीने शिंदे -फडणवीस सरकारच्या या विकासकामाना स्थगिती व विकासकामे रद्दच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली. राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन होताच, त्यांनी महाविकासआघाडी सरकारने मंजूर केलेल्या अनेक विकासकामांना स्थगिती दिली. शिंदे सरकारच्या ग्रामविकास विभागाने १९ जुलै आणि २५ जुलै रोजी महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेली तसंच वर्क ऑर्डर निघालेल्या कामांनाही थेट स्थगिती दिली होती.

ग्रामविकास विभागाने १९ व २५ जुलै रोजी अधिसूचना काढून मविआ सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली व वर्क ऑर्डर काढलेल्या कामांना स्थगिती दिली. शिंदे-फडणवीस सरकारच्या या दोन्ही अधिसूचनांना बालेवाडी ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ३१ मार्च २०२२ रोजी मविआ सरकारने या ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गटारांच्या बांधकामासाठी निविदा काढून यशस्वी कंत्राटदाराला वर्क ऑर्डरही दिली. मात्र, १९ व २५ जुलैच्या सरकारच्या निर्णयामुळे हे बांधकाम खोळंबले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT