Rise in temperature Dainik Gomantak
महाराष्ट्र

उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा तापणार; उष्णतेची लाट येण्याची शक्यता

उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाडा तापणार

दैनिक गोमन्तक

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात कमालीचा बदल जाणवत असून कुठे पाऊस तर कुठे तापमानात वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण इशारा देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Heat Wave conditions over north Madhya Maharashtra & Marathwada during 30th March-01st April, 2022)

देशात 27 मार्चपासून राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येणार असून त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेशापर्यंत ती प्रवेश करेल असे सांगण्यात आले होते. तर पुढील तीन दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि गुजरात राज्याकडून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी अन्य जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत काही भागात उष्णतेची लाट जाणवेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर 28, 29 आणि 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान खात्याने (weather department) दिला आहे.

राज्यात उष्णता (Heat wave) आणखी वाढणार आहे. राज्यात तापमानात तब्बल 2 ते 3 अंशांनी वाढणार असून विदर्भात 28 ते 30 मार्च दरम्यान अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी 40 अंश डिग्री सेल्सियसपेक्षा तापमना गेलं आहे. सोलापूर, अहमदनगर, परभणीसोबत विदर्भात तापमानाचा पारा 40 पार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी.

या जिल्ह्यात वाढणार पारा

28 मार्च : बुलडाणा, अकोला

29 मार्च : बुलडाणा अकोला, अमरावती

30 मार्च : अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती

31 मार्च : जळगाव, औरंगाबाद, अहमदगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर

1 एप्रिला : जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT