harshvardhan patil dainikgomantak
महाराष्ट्र

शेतीपंपाची वीज तोडणी थांबवा, अन्यथा... : हर्षवर्धन पाटलांचा इशारा

शेतीपंपाची वीज तोडूण महाविकास आघाडी सरकार काय साध्य करायचय? हर्षवर्धन पाटील

दैनिक गोमन्तक

इंदापूर : सध्या शेतीपंपांची वीज तोडणीवरून राज्य सरकारवर चारीकडून टीका होताना दिसत आहे. तर महावितरणमधील तुट भरूणकाढण्यासाठी वीज तोडणी केल्याशिवाय गत्यंतर नाही असे महावितरणमधील प्रशासनाचे म्हणणे आहे. आता महावितरणचा मोर्चा शेतीपंपांकडे वळला असून मोठ्या प्रमाणावर शेतीपंपांची वीज तोडणी केली जात आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके जळून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करून महाविकास आघाडी सरकार काय साध्य करत आहे? असा सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारने तात्काळ वीज तोडणी मोहीम थांबवावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी दिला.

(Harshvardhan Patil Warning to State Government on power cut campaign of agricultural pumps)

तसेच राज्यसरकारमध्ये (State Government) आपल्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी (representative) असून देखील ते गप्प आहेत, एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली. तसेच सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे शेतीपंपांची वीज तोडूण शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. हे शासन सत्तेवर आल्यापासून वीज तोडूण शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे काम करत आहे. सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळे पिकांना (crops) पाण्याची गरज असताना, राज्य सरकारकडून पाणी असूनही वीज बंद केली जात आहे. असे करणे म्हणजे शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचा हा प्रकार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

तसेच शेतकऱ्यांना (farmers) अव्वाच्या सव्वा बिले येत असताना ती बिले दुरुस्त करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपासून प्रत्येक वीज तोडणीमध्ये शेतकऱ्याकडून काही रक्कम महावितरणकडून वसूल केली जात असून, थकबाकीचे मूळ दुखणे कायम राहत आहे. सध्या शेती पंपाची वीज खंडित करण्यात येत असल्याने शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT