Hapus Mango  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकणातील हापुसवर अवकाळी पावसाची संक्रांत

ढगाळ वातावरणामुळे शेतात तुडतुडा आणि फुलकिडा यासारख्या रोगांनी हापूस बागायतदारांच्या चितेत भर टाकली आहे.

दैनिक गोमन्तक

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्यात थंडीसोबतच अवकाळी पावसाचाही जोर वाढला आहे. बोचरी थंडी तर आहेच त्याचबरोबर ढगाळ वातावरण असल्याने फळ पिकांचे नुकसान होत आहे. या विचित्र वातावरणाने गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील आंबा बागायतदारांमध्ये चिंताग्रस्त वातावरण दिसत आहे. काल गुरूवारी ढगाळ वातावरणामुळे (Maharashtra Weather Updates) शेतात तुडतुडा आणि फुलकिडा यासारख्या रोगांनी हापूस बागायतदारांच्या (Hapus mango) चितेत भर टाकली आहे. वारंवार औषध फवारणी केल्याने शतकऱ्यांच्या खर्चात भर पडली आहे. (Konkan Weather Updates: Crops damaged due to bad weather)

उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेमुळे कोकणात तापमानाचा पारा घसरू लागला होता. हापूसला पोषक थंडीही पडू लागली आहे. मात्र अचानक रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले आणि फळपिकांचे नुकसान होत आहे. दापोलीत काहीवेळ पाऊस पडल्याने उशिराच्या टप्प्यात आलेल्या मोहोरामध्ये पावसाचे पाणी साचून बुरशीजन्य रोगांची निर्मिती होत आहे. या रोकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बागायतदारांना बुरशीनाशकांची फवारणी करावी लागली. सुरुवातीच्या टप्प्यात दोन ते तीन फवारण्या करणारा बागायतदार अवकाळी पावसामुळे चार पाच वेळा फवारणी करावी लागत आहे.अशा परिस्थितीत पिकांचे संरक्षण करण्यासाठी कोकणातील बागायतदाराची धावपळ सुरू असताना अवकाळी पावसानंतर लगेचच कडाक्याची थंडी पडली.

दापोली, खेडमधल्या वातावरणाचा विचार केला तर पारा 9 ते 10 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेला आहे. महाराष्ट्रात सगळीकडेच पारा खाली घसरला आहे. थंडीमुळे अनेक बागांमध्ये जुन्या आंब्याच्या मोहोराला पुन्हा मोहोर आल्याने लहान कैरी गळून जात आहे. आधीच बदलत्या हवामानाचा फटका हापूसच्या उत्पादनाला बसणार आणि अवकाळी पावसामुळे फवारणीच्‍या खर्चात वाढ या दोन्ही परिस्थितीतून कोकणातला बागायतदार जातांना दिसत आहे. कोकणात काल गुरुवारी दुपारपर्यंतह ढगाळ वातावरण होते. या अवकाळी पावसामुळे फळावर काळे डाग पडले तर काही ठिकाणी कैरीची गळही झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT