Navneet Rana new challenge to CM Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

आता BKC मैदानावर म्हणणार हनुमान चालिसा : नवनीत राणांचे उद्धव ठाकरेंना नवे आव्हान

उद्धव ठाकरें लाचार मुख्यमंत्री, तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र, तर मीही महाराष्ट्राची कन्या: नवनीत राणा

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 मे रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए ग्राऊंडवर एका विशाल जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले- 'भाजपचे लोक आजकाल दाऊदच्या मागे लागले आहेत. उद्या दाऊद भाजपमध्ये दाखल झाला तर ते त्यालाही मंत्री करतील.' शिवसेनाप्रमुखांच्या या वक्तव्यावर आता अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, 'काही वर्षांपूर्वीपर्यंत शिवसेना भाजपसोबत होती, मग शिवसेना दाऊद आहे का? पाठीत खंजीर खुपसणे ही शिवसेनेची सवय आहे.' (Navneet Rana new challenge to CM Uddhav Thackeray)

'काल ज्या मैदानावर उद्धव ठाकरेंनी हनुमानजींचा अपमान केला, येत्या काळात तिथे हनुमान चालीसा पाठ करू.तू माणूस आहेस, तुझ्याकडे आमच्यापेक्षा जास्त ताकद आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांवर एकही टिप्पणी केली नाही. उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या मार्गावर चालले आहेत का? शिवसेना औरंगजेबांची सेना झाली आहे का?' असे प्रश्न उपस्थित करत मुख्यमत्री ठाकरे यांच्यावर नवनीत राणा यांनी टिकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरें लाचार मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे हे लाचार मुख्यमंत्री अशी सणसणीत टिका आज राणा यांनी दिल्लीतून केली. 'काल महाराष्ट्राच्या असहाय मुख्यमंत्र्यांची लाचार सभा झाली. ना शेती, ना बेरोजगारी, आणि लोडशेडिंगवर कोणतेही भाष्य नाही. ते स्वत: अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. त्यांचा मुलगा म्हणाला, मुख्यमंत्री विदर्भ आणि मराठवाड्यात गेले. विदर्भातील कोणत्या भागात आलेत त्याचा व्हिडिओ त्यांना प्रसिद्ध करावा. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर एक शब्दही ते बोलले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारच्या तुलनेत बेरोजगारी तीन पटीने वाढली आहे,'असेही राणा म्हणाल्या.

तूम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र, तर मीही महाराष्ट्राची कन्या : नवनीत राणा

औरंगाबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या औरंगजेब यांच्या कबरीवर फातिहा पठण केल्याबद्दल नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.'संभाजी महाराजांना अभिवादन करण्याचा दिवस होता. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पुष्प अर्पण केले. औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करणे हे तुमच्या अजेंड्यावर होते. पण तुम्ही अत्यंत लाचार मुख्यमंत्री आहात. काल खासदाराने त्यांच्या हातात संकटनिवारणाची गदा दिली. तूम्ही त्या गदेला अस्पृश्य वागणूक दिली. हनुमान चालीसा वाचणारे कुठे गेले? कदाचित ते टीव्ही पाहत नाही. तूम्ही जसे महाराष्ट्राचे सुपुत्र आहात तशी मीही महाराष्ट्राची कन्या आहे. म्हणून मला राज्य संकटात असतानाच संकटमोचन हनूमानांची आठवण येते,' असेही वक्तव्य राणा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT