Great performance of Miraj police Goa made liquor seized
Great performance of Miraj police Goa made liquor seized 
महाराष्ट्र

मिरज पोलिसांची मोठी कामगिरी! गोवा विदेशी बनावटीची दारु जप्त

गोमंन्तक वृत्तसेवा

महाराष्ट्र-कर्नाटक मार्गावर मिरज उपविभागीय पोलिस अधीक्षक पथकाने सापळा रचून गोवा (Goa) विदेशी बनावटीची दारुसह सात लाखाचा मुद्देमाल पकडला आहे. यासंबंधी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिरज पोलिसांची (Miraj Police) चोवीस तासातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. 

मोठ्या कारमधून गोवा बनावटीची विदेशी दारुचा साठा आणला जात असल्याची माहिती मिरज पोलिस पथकाने दिली आहे. त्यानुसार मिरजमध्ये विजय म्हैसाळ रस्त्यावर टाटा सुमो पोलिसांनी अडवली असता त्यामध्ये असलेल्या चौघांनी गाडी सोडून तिथून पळ काढला. मिरज पोलिस पथकाने सुमो गाडीची  तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारुचा साठा आढळून आल्यानंतर तो जप्त केला. 2 लाख 480 रुपये किंमतीची विदेशी दारु, मोबाईल आणि त्याचबरोबर पाच लाख एवढा मुद्देमाल जप्त केला आहे. (Great performance of Miraj police Goa made liquor seized)

दरम्यान, या प्रकरणी बाबासो पंडित तांबे (Babaso Pandit Tambe), अजय शिंदे (Ajay Shinde) हे दोन आरोपी आहेत. पोलिसांनी बाबासो तांबे याला ताब्यात घेतले आहे. तर अजय शिंदे आणि इतर दोघेजण अद्यापपर्यंत फरार आहेत. मागील दोन दिवस गोवा विदेशी बनावटीची दारु सापडत असल्याने राज्य उत्पादन शुल्क गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. मिरज उपविभागीय पोलिस अधिक्षक अशोक विरकर यांनी आज कारवाईसंबंधीची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT