Governor Bhagat Singh Koshyari Dainik Gomantak
महाराष्ट्र

"गुजराती लोक गेले तर मुंबईची ओळख राहणार नाही", राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने नवा वाद

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असे वक्तव्य करुन त्यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. (Bhagat Singh Koshyari Statement)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

दरम्यान, कोश्यारी यांचे हे विधान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावाना व्यक्त केली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा'. (Bhagat Singh Koshyari News In Marathi)

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

गुजराती, राजस्थानी निघून गेले तर आर्थिक राजधानी मुंबई राहणार नाही. राजस्थानी मारवाडी समाजान व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय केला नाही. त्यांनी शाळा, महाविद्यालये, बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस या देशांमध्ये देखील आहे. जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT