Governor Bhagat Singh Koshyari Dainik Gomantak
महाराष्ट्र

Governor Bhagat Singh Koshyari: मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं PM मोदींना राजीनामा पत्र

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून गाजत असतानाच राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान मोदींकडे पाठवले आहे.

दैनिक गोमन्तक

Governor Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून गाजत असतानाच राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान मोदींकडे सुपुर्द केले आहे. उर्वरित काळ चिंतनात घालवायचा आहे, असे यावेळी कोश्यारी म्हणाले. त्याचबरोबर आपण यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे देखील कोश्यारी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली. त्यामुळे राज्यातील वातावरण खूप दूषित झाले होते. महापुरुषांचा अपमान, महाविकास आघाडी सत्तेत असताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कोश्यारी यांना राजीनामा देण्याची वेळ आली असल्याचे आता विरोधकांकडून म्हटले जात आहे.

यापूर्वी, आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला सर्व राजकीय जबाबदाऱ्यांपासून मुक्त व्हायचे आहे, असे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी सांगितले की, 'मी सर्व राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान मोदींकडे बोलून दाखवली आहे.'

दुसरीकडे, शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतरच कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहून शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला होता. याशिवाय, मी अमित शहा यांना विचारले होते की, मला सांगा आता मी काय करु? असेही कोश्यारी म्हणाले होते.

तसेच, आता त्यांनी आपली इच्छा पंतप्रधान मोदींकडे बोलून दाखवली आहे. कोश्यारी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कळवले आहे की, मला “सर्व राजकीय जबाबदारीतून मुक्त” व्हायचे आहे.

कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संतांची, समाजसुधारकांची आणि शूर सेनानींची भूमी असलेल्या महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) महान राज्याचा राज्यपाल म्हणून काम करणे खूप खास होते.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT