Marine Lines Hostel Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

Marine Lines Hostel Case: सरकारी हॉस्टेलची दैना; विद्यार्थीनींनी वाचला समस्यांचा पाढा

Ashutosh Masgaunde

Marine Lines Telang Memorial Hostel Case: दक्षिण मुंबईतील एका वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर 18 वर्षीय तरुणी तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्याच्या तीन दिवसांनंतर, मरीन लाइन्समधील मुलींच्या वसतिगृहातील रहिवाशांना तेलंग मेमोरियल या जवळच्या सरकारी मुलींच्या वसतिगृहात हलवण्यात आले आहे. यानंतर येथील विद्यार्थीनींनी वसतिगृहाच्या अनेक समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

यामधील 30 विद्यार्थीनी, ज्या आपल्या परीक्षेसाठी तेलंग स्मारक येथे वास्तव्यासाठी असतील.  तज्ञांच्या मदतीने  या मुलींसाठी एक संक्षिप्त समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले होते.

मरीन लाइन्स गर्ल्स वसतिगृहातील विद्यार्थीनींनी सांगितले की, 18 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर आता हे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र आम्ही जेव्हा वसतिगृहाचे प्रश्न उपस्थित करत होतो त्यावेळी त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.

मरीन लाइन्समधील महिला वसतिगृहाच्या 30 वर्षीय वॉचमनने सोमवारी रात्री एका 18 वर्षीय मुलीवर तिच्या वसतिगृहाच्या खोलीत बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपीनेही चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेमुळे मुंबईतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असुरक्षित पायाभूत सुविधा, सीसीटीव्हीची अनुपस्थिती, अपुरे कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांची कमतरता या वसतिगृहांच्या समस्यांपैकी काही प्रमुख समस्या आहेत.

मरीन लाइन्स वसतिगृह, जिथे विद्यार्थीनी मृतावस्थेत सापडली होती, तिथे 450 विद्यार्थीनींसाठी राहण्याची सोय आहे. वसतिगृहातील रहिवाशांना मे महिन्यात वांद्रे येथील नवीन इमारतीत स्थलांतरित केले जात होते, कारण सध्याच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनचे (सीओपीएस) अमर एकड म्हणाले, "पर्यायी व्यवस्था निश्चित करण्यात आली होती, परंतु नवीन इमारतीत पाणी आणि वीज जोडणी नसल्याने विद्यार्थीनींना तेथे शिफ्ट केले नव्हते."

विद्यार्थ्यीनींना वांद्रे येथील नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र, मे उलटून गेला तरी विद्यार्थीनी जुन्या वसतिगृहाच्या इमारतीतच राहत होत्या.

मरीन लाइन्समधील गर्ल्स हॉस्टेलमधील विद्यार्थ्यीनींना तेलंग स्मारकमध्ये हलवल्यानंतर एका विद्यार्थिनीने सांगितले की, हे सर्व आता घडत आहे. यापूर्वीही आम्ही वारंवार प्रश्न मांडत असताना आमच्या समस्यांकडे कोणीही लक्ष दिले नाही. अनेक खोल्यांचे कुलूप तुटलेले होते. आम्हाला काही अडचण येत आहे की नाही हे पाहण्यासाठी वॉर्डनने वसतिगृहाची फेरी मारण्याची तसदीही घेतली नाही. पण, आता ती अचानक खूप काळजीत आहे आणि उच्चपदस्थ अधिकारीही आम्हाला भेटायला येत आहेत.  

“घटनेच्या एक दिवस आधी माझ्या दारावर टकटक झाली. माझी मैत्रीण असेल असे समजून मी दार उघडले. पण तो प्रकाश (वॉचमन) इतर दोन व्यक्तींसोबत होता. त्याना माझ्या खोलीच्या बाहेर लटकलेल्या काही तारा कापायच्या होत्या. मी माझ्या घरच्या कपड्यात होते आणि लगेच दार बंद केले," असे एका विद्यार्थीनीने सांगितले. ती पुढे म्हणाली, प्रकाशची मुलींशी अति जवळीक होती हे वॉर्डन आणि इतर कर्मचार्‍यांना माहित नसने अशक्य आहे. प्रकाशला सर्वत्र प्रवेश होता, तर वॉर्डन आणि इतर महिला कर्मचारी कधी भेटायचेच नाहीत.

मुलींच्या वसतिगृहात सर्व महिला कर्मचारी असावेत असा कोणताही नियम किंवा धोरण नसले तरी, अनेक विद्यार्थीनी तसेच त्यांच्या पालकांची ही मागणी आहे. असे आदित्य आश्रवस्ती या विद्यार्थीनीने सांगितले.

तेलंग वसतिगृहातील एक विद्यार्थिनी म्हणाली, “ महिला कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकही महिला नाही. एक वॉर्डन आणि दोन प्रशासकीय कर्मचारी आहेत पण आठवड्याच्या शेवटी ते इथे नसतात.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT