Google Doodle Pays Tribute to Indias First Muslim Woman Teacher Fatima Sheikh Dainik Gomantak
महाराष्ट्र

Fatima Sheikh: पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला Google Doodleची श्रद्धांजली

आद्यप्रवर्तक आणि समाजसुधारक ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी 1848 मध्ये स्वदेशी ग्रंथालयाची सह-स्थापना केली होती

दैनिक गोमन्तक

भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फामिता शेख यांची आज 191 वी जयंती आहे. यावेळी गुगलने डूडल (Google Doodle) बनवून त्यांचा गौरव केला. फातिमा शेख (Fatima Sheikh) यांनी समाजसुधारक ज्योतीबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्यासोबत मिळून 1848 मध्ये स्वदेशी लायब्ररी सुरू केली, ही देशातील पहिली मुलींची शाळा असल्याचे मानले जाते. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यात झाला. त्या तिचा भाऊ उस्मानसोबत राहत होत्या. दीन-दुबळ्या आणि गरीबांच्या शिक्षणाला विरोध केल्याने फुले दाम्पत्याला वडिलांनी घराबाहेर काढले तेव्हा उस्मान शेख आणि फातिमा यांनी त्यांना आश्रय दिला होता.

शेख यांच्या घरी स्वदेशी वाचनालयाची स्थापना झाली. इथूनच फातिमा शेख आणि फुले दाम्पत्याने समाजातील गरीब, वंचित घटक आणि मुस्लिम महिलांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले. पुण्याच्या या शाळेत त्याकाळी जात, धर्म आणि लिंगाच्या आधारावर ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले, अशा लोकांना शिक्षण देण्यासाठी महायज्ञ सुरू करण्यात आला होता.

त्या घरोघरी जाऊन मुलांना शाळेत आणत होत्या

फातिमा घरोघरी जाऊन मुलांना आपल्या घरी अभ्यासासाठी बोलवायच्या. वंचित मुलांनी भारतीय जातिव्यवस्थेचे अडथळे पार करून वाचनालयात येऊन अभ्यास करावा अशी त्यांची इच्छा होती. फुले दाम्पत्याप्रमाणेच त्याही आयुष्यभर शिक्षण आणि समतेच्या संघर्षात गुंतल्या होत्या. या मोहिमेत त्यांना मोठ्या अडथळ्यांचाही सामना करावा लागला होता. समाजातील प्रभावशाली वर्गाने त्यांच्या कामात अडथळे आणले. त्यांचा छळ झाला, पण शेख व त्याच्या साथीदारांनी हार मानली नाही. स्त्रीशिक्षणाचे काम त्यांना आजिवन सुरू ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT