Liquor Dainik Gomantak
महाराष्ट्र

Satara Crime: साताऱ्यात गोवा बनावटीची 85 लाखांची दारु जप्त; सांगली, साताऱ्यातील दोघांना अटक

Goa Made Liquor Seized In Satara: संशयित ट्रक समोरुन येताच पहाटे ३.१० वाजता पोलिसांनी ट्रकची तपासणी केली यात गोवा बनावटीचा मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला.

Pramod Yadav

सातारा: गोवा बनावटीची ८५ लाख रुपये किंमतीची दारु साताऱ्यात जप्त करण्यात आली आहे. सातारा गुन्हे अन्वेषण विभाग, उत्पादन शुल्क आणि बोरगाव पोलिसांनी संयुक्त पद्धतीने मंगळवारी (२९ एप्रिल) पहाटे ३.१० च्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत एकूण एक कोटी ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आलीय.

सचिन विजय जाधव (रा. आळसंद, खानापूर जिल्हा सांगली) आणि जमीर हरुण पटेल (रा. मलकापूर, कराड जिल्हा सातारा) असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

अवैध मद्य वाहतुकीबाबत सातारा गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबी, उत्पादन शुल्क खाते आणि बोरगाव पोलिसांचे एक संयुक्त पथक तयार केले.

बोरगावच्या हद्दत या पथकाने सापळा रचला होता. संशयित ट्रक समोरुन येताच पहाटे ३.१० वाजता पोलिसांनी ट्रकची तपासणी केली यात गोवा बनावटीचा मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी जप्त केलेल्या मद्याची किंमत ८४ लाख ४१ हजार ४० रुपये एवढी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी मद्य आणि ट्रक असा मिळून एक कोटी ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT