Liquor Seized In Sindhudurg Dainik Gomantak
महाराष्ट्र

Liquor Seized In Sindhudurg: नगरपंचायत निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कणकवलीत 7 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; गुजरातच्या दोघांवर गुन्हा दाखल

Goa Made Liquor Smuggling In Kankavli: कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या दारुची मोठ्या प्रमाणात होणारी अवैध वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडली.

Manish Jadhav

कणकवली: कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या दारुची मोठ्या प्रमाणात होणारी अवैध वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडली. कणकवलीतील वागदे एसटी थांब्याजवळ उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 7 लाख 20 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारु जप्त केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद वाटणाऱ्या एका बोलेरो पिकअप गाडीतून ही दारु घेऊन जाण्यात येत होती. या पिकअपमधून गोवा बनावटीच्या दारुचे तब्बल 150 बॉक्स जप्त करण्यात आले. या दारुची किंमत अंदाजे 7 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. जप्त केलेली दारु आणि वाहतुकीसाठी वापरलेले सुमारे 9 लाख 50 हजार रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन मिळून एकूण 16 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला.

निवडणुकीच्या तोंडावर दारुची ही मोठी खेप जप्त झाल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने गुजरातमधील (Gujrat) दोघांवर गुन्हा दाखल केला. ही दारु नेमकी कोणासाठी आणली जात होती, याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांपर्यंत या दारु तस्करीच्या रॅकेटचे जाळे कसे पसरले आहे, याचा सखोल तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर मतदारांना प्रभावित करण्यासाठी ही दारु आणली जात असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. अवैध दारुची वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमेवर आणि मुख्य मार्गांवर आपली गस्त वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT