Girls were beaten with slippers for wearing shorts in Pune  Dainik Gomantak
महाराष्ट्र

धक्कादायक! शॉर्ट्स घालून फिरल्यामुळे पुण्यात तरुणींना चप्पलने मारहाण

चंदननगर पोलिसात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक

महिलांच्या वेशभूषेवरून आजवर अनेकवेळा त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. आजच्या जमान्यातही असे काही लोक आहेत जे महिलांना त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून नाहक त्रास देत आहेत. असाच किळसवाणा प्रकार पुण्यातील काही तरुणींसोबत घडला आहे. शॉर्ट्स घालून फिरल्यामुळे त्या राहत असलेल्या सोसायटीतील एका कुटुंबातील लोकांनी त्यांना चप्पलने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या तरुणी आयटी इंजिनिअर असून खराडी येथील आयटी कंपनीत कार्यरत आहेत. त्या खराडीमधील फेज दोनमध्ये अनुसया पार्क लेक्सीस सोसायटीत 'पेईंग गेस्ट' (PG) म्हणून राहत आहेत. या मुली अनेकदा शॉर्ट्स घालून वावरत असत. मात्र मुलींकडून केल्या जाणाऱ्या पेहरावरून सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने मुली राहत असलेल्या घर मालक यांच्याकडे त्यांच्या कपड्यांवरून तक्रार केली. त्यावर घर मालकाने मुलींनी काय घालावे, कसे राहावे तो पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे, असे सांगितले. (Girls were beaten with slippers for wearing shorts in Pune)

मात्र घरमालकाने दिलेल्या उत्तराचा आरोपीच्या कुटुंबियांना राग आला. यानंतर आरोपीच्या कुटुंबातील 55 वर्षीय महिलेने रात्रीच्या वेळी मुली राहत असलेल्या घरात घुसून त्यांना अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुली रहात असलेल्या खोलीमध्ये जात त्यांनाही चप्पलने मारहाण केली. त्यानंतर घाबरलेल्या मुलींनी घरमालकिणीच्या मदतीने चंदननगर पोलिसात तक्रार केली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT