Serum Institute of India Dainik Gomantak
महाराष्ट्र

लसीमुळे मुलीचा मृत्यू! सीरमला मागितली हजार कोटींची नुकसान भरपाई

दैनिक गोमन्तक

कोरोना लसीमुळे डॉक्टर मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे 1000 कोटींच्या नुकसानीची मागणी केली आहे. लसीच्या दुष्परिणामामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा दावा आहे. त्यांचा दावा आहे की त्यांच्या मुलीच्या शरीरावर कोविशील्ड लसीचा दुष्परिणाम झाला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे राहणारे या पीडित वडील दिलीप लुणावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्यांची मुलगी स्नेहा लुणावत ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती. त्यांना सांगण्यात आले की, कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे शरीरावर कोणताही चुकीचा परिणाम लसीमुळे होत नाही. यामुळे स्वत: आरोग्य सेविका असल्याने त्यांनी आपल्या महाविद्यालयात लसीचा डोस घेतला, मात्र लसीचा डोस घेतल्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.

नाशिकच्या मेडिकल कॉलेजती विद्यार्थिनी स्नेहा लुणावतच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीने 28 जानेवारी 2021 रोजी कोविशील्ड लसीचा डोस घेतला आणि 1 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. केंद्र सरकार (Central Government), राज्य सरकार (State Government) आणि लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला म्हणून न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूटला नुकसान भरपाई म्हणून एक हजार कोटी रुपये देण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचीका पिडित मुलीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आणि AIIMS यांनी या लसीचे दुष्परिणाम नसल्याबद्दल चुकीची माहिती दिली होती आणि राज्य सरकारनेही तपासणी न करता ही लस दिली होती, असेही त्यांनी यावेळी आपल्या याचिकेत म्हटले आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि इतर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपण ही याचिका दाखल करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. चुकीची माहिती देऊन आपल्या मुलीला लस देण्यात आली हे सरकारने मान्य करावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.

आपल्या याचिकेत पीडितेच्या वडिलांनी भरपाई म्हणून सीरम इन्स्टिट्यूटकडे (Serum Institute of India) एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याचबरोबर गुगल, यूट्यूब, मेटा यांसारख्या कंपन्या लसीमुळे होणाऱ्या मृत्यूंची योग्य आकडेवारी जाहीर करत नसल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे या कंपन्यांवरही कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत अशी ही मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT