Ratnagiri Cylinder Blast Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ratnagiri Cylinder Blast: रत्नागिरीत सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू

Ratnagiri Cylinder Blast news: ही घटना आज सकाळी झाली असून यात एका नगरिकाचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Ratnagiri Cylinder Blast: रत्नागिरीत आज सकाळी 5 च्या सुमारास गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. येथील शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत शेट्ये नगर येथील एका दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.

स्फोट एवढा मोठा होता की घराच्या भिंती कोसळल्या. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घरात चौघे जण अडकले असल्याची माहिती असून यातील दोघांना बाहेर काढण्यात आले आहे. इतर दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

शेट्ये नगर येथे राहणारे अश्फाक काझी यांच्या घरात सिलेंडर स्फोट होऊन ही आग लागली आहे. आतापर्यंत तीन लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाची माहिती मिळताच तीन रुग्णवाहिका आणि पोलीस पथक तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी मदतीसाठी घटनास्थळी पोहचले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. ते पहाटे घरी आल्याने त्यांनी घरातील लाइट लावताच हा भीषण स्फोट झाला.

तब्बल दोन किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. स्फोट इतका भीषण होता की आजुबाजूच्या घरांवरच्या काचा फुटल्या असून यामुळे काही नागरिक जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Womens World Cup 2025: "एक वक्त था जब पाकिस्तान..." टीम इंडियानं विश्वचषक जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूचं विधान चर्चेत

Horoscope: 'या' 3 राशींचे नशीब चमकणार! गुरु-शुक्र केंद्र योग देणार अफाट यश आणि धनलाभ; करिअर आणि व्यवसायातही होणार मोठी प्रगती

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

SCROLL FOR NEXT