Ganeshotsav 2025 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ganeshotsav 2025: चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी! टोल माफी मिळाली…पण टोलमाफीचा 'पास' मिळणार कुठे? जाणून घ्या

Ganeshotsav 2025: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाचे वातावरण पसरले आहे. विशेषतः कोकणात या सणाचा वेगळाच रंग आणि लगबग पाहायला मिळतो.

Sameer Amunekar

संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाचे वातावरण पसरले आहे. विशेषतः कोकणात या सणाचा वेगळाच रंग आणि लगबग पाहायला मिळतो. मुंबईसह देशातील विविध भागातून कोकणातील गावांना जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील सर्व टोल नाक्यावर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. यात खास करून एसटी बसेससुद्धा समाविष्ट आहेत.

यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास जारी केले जाणार आहेत. या पासवर वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव व इतर आवश्यक माहिती नोंदवली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी हा पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध राहणार आहे. प्रवासाच्या परतीसाठीही हा पास वैध मानला जाणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या आदेशानुसार सर्व ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाला प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या टोलमाफीपास संदर्भातील माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जाहीराती व सूचना प्रसिद्ध करण्याचेही आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT