BJP Dainik Gomantak
महाराष्ट्र

सावरकरांवरुन पुन्हा वादंग, BJP ने खेळला नवा डाव; गौरव यात्रेचा प्लॅन...

BJP: हे एक ऐतिहासिक तथ्य आहे, ज्याचा संदर्भ आहे, असे हरिश रावत यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

BJP: राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी संसदेतील आपली खासदारकी रद्द करत निषेध नोंदवला होता.

राहुल गांधींनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचा उल्लेख केला होता. त्यामुळे देशभरातले वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्यानंतर ज्या ठाकरे गटाने निषेध व्यक्त केला होता, त्या ठाकरेगटानेदेखील सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

त्यात सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी जर राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर त्यांच्याविरुद्ध केस दाखल केली जाईल असे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ कॉंग्रेसनेता हरिश रावत यांनी राहुल गांधींचा बचाव करत राहुल गांधींनी जे म्हटले ते ऐतिहासिक तथ्य आहे असे म्हटले आहे. याप्रकरणात कॉंग्रेसने फक्त भाजपला आरसा दाखवला आहे. हे एक ऐतिहासिक तथ्य आहे, ज्याचा संदर्भ आहे, असे हरिश रावत यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा मुद्दा फक्त उद्धव ठाकरेंपुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेबरोबर जोडला आहे. सावकर हे स्वातंत्रवीर होते , समाजसुधारक होते.

आम्ही कालही कॉंग्रेसच्या बैठकीत गेलो नव्हतो आणि आजही जाणार नाही. आम्ही या मुद्यावर राहुल गांधीबरोबर चर्चा करु असेही त्यांनी म्हटले आहे. याबरोबच भाजपने गौरव यात्रा काढणार असल्याचे म्हटले आहे.

आता या प्रकरणावरुन देशातले आणि राज्यातले राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT