Konkan Railway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railwayची फसवणूक करणं पडलं महागात

कामगारांचा भविष्य निर्वाह निधी तसेच इतर निधी मिळून 18 लाख 6 हजार 65 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील वेर्णा आणि मडगाव (Margao) येथील कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) गार्ड आणि लोको पायलटसाठी असलेल्या विश्रामगृहाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराने मोठा घोळ केल्याचे समोर आले कामगारांचा भविष्य निर्वाह निधी तसेच इतर निधी मिळून 18 लाख 6 हजार 65 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (CBI) गोवा विभागाने दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय यांत्रिकी अभियंता मंजुनाथ क्षेत्रपाल यांच्यासह कंत्राटदार एम. के. बेलावाडी, गोरधन लाल बलाल आणि उदय बेलावाडी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी करण्यास सुरवात केली. त्यानुसार, हुबळी येथील एम. के. बेलावाडी या कंत्राटदाराला वेर्णा आणि मडगाव येथील कोकण रेल्वेच्या गार्ड आणि लोको पायलटसाठी असलेल्या विश्रामगृहाची देखभाल करण्यासाठी 18 मे 2018 रोजी 94 लाख 35 हजार 476 रुपयांचा कंत्राट कोकण रेल्वेने 1 जून 2018 ते 25 मे 2019 या कालावधीसाठी दिला होता. हे सर्व कंत्राट कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय यांत्रिकी अभियंता मंजुनाथ क्षेत्रपाल यांनी दिले होते.

यासाठी कोकण रेल्वेने कंत्राटदाराला अकुशल कामगारांना प्रत्येकी 14,610 रुपये वेतन , तर कुशल कामगारांना प्रत्येकी 19,350 रुपये वेतन दिले होते. परंतु कंत्राटदाराने अकुशल कामगाराना फक्त 7,000 रुपये तर कुशल कामगारांना 10 हजार रुपये दिल्याचे तपासातून समोर आले आहे. मात्र कंत्राटदाराने रेल्वेकडून पुर्ण रक्कम घेतली होती. यासाठी त्यांनी त्या कामगाराच्या बँक खात्याचे एटीएम कार्ड वापरून खात्यात जमा होणाऱ्या वेतनाचे बॅंक स्टेटमेंन्ट तपासले असता हा सगळा घोळ उजेडात आला आहे. या व्यतिरिक्त कंत्राटदाराने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी तसेच राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे (ESI) पैसे जमा न करता बनावट दस्तावेज तयार करून ती रक्कम रेल्वेकडून घेतल्याचेही या तपासातून समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर सीबीआयने कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय यांत्रिकी अभियंता क्षेत्रपाल याच्यासह कंत्राटदार बेलावाडी, गोरधन लाल बलाल आणि उदय बेलावाडी या संशयितांनी षडयंत्र रचून कोकण रेल्वेची 18,06,065 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सीबीआय गोवा विभागाचे अधीक्षक आशिष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन निरीक्षक अनिल कुमार दबास यांनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल केला, तर त्यांच्यानंतर तत्कालीन निरीक्षक एस. एस. परब यांनी पुढील तपास केला होता. आता निरीक्षक संदीप हळदणकर यांनी तपास पूर्ण करून गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT