Fraud of houses Dainik Gomantak
महाराष्ट्र

कल्याण, डोंबिवली येथे घर देतो असे सांगत सुमारे साडेतीन कोटीची फसवणूक

भामट्याने आपण कल्याण पालिकेत असल्याचं सांगत ४९ जणांना फसवले

दैनिक गोमन्तक

ठाणे : मुंबई, ठाणे या सारखी शहरे जास्त घनतेची असल्याने या शहरांमध्ये नागरीकांसाठी निवासाकरीताचे समस्या असतात. याचा फायदा घेत नागरिकांना फसवले जाण्याची शक्यता ही अधिक असते. अशा फसवणूकीच्या घटना यापूर्वी घडल्या असून अशाच प्रकारची फसवणूक कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत घडल्याची घटना समोर आली आहे. (Fraud of around crores for providing houses in Kalyan Dombivali )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार केंद्र शासनाच्या निधीतून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जाते. कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयाजवळील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये या प्रकल्पाची घरे उभारण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर सुरेश दत्ताराम पवार याने आपण सरकारी नोकर असून आपली कल्याण डोंबिवली पालिकेत ओळख असल्याचं सांगत आपल्या साथीरांच्या मदतीने फसवणूक केली आहे.

पालिकेत ओळख असल्याने इंदिरानगरमध्ये आपण तुम्हाला स्वस्तात गाळे, सदनिका खरेदी करून देतो. असे आश्वासन देत ४९ ग्राहकांकडून सहा लाख ते ५० लाखापर्यंतच्या रकमा घेत एकूण तीन कोटी ४७ लाख रूपयांना फसवले आहे. पैसे घेणाऱ्यांना सुरेश ने सहा महिन्यात आपल्याला गाळे, सदनिका स्वस्तात खरेदी करून देतो. अशी बतावणी करुन पैसे घेतले मात्र सहा महिन्यानंतर सुरेश चालढकल करत असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी पोलीसात तक्रार केली यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पुढील बोगस नावांचा वापर करत केली फसवणूक

पालिका अधिकाऱ्यांची नक्कल, बनावट नावे वापरून झोपु योजनेतील कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. शहर अभियंता प्रकाश पुराणिक, मालमत्ता उपायुक्त विषय कुरळेकर नावे बनावट कागदपत्रांवर आहेत. अशा नावाचे अधिकारी पालिकेत कार्यरत नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

SCROLL FOR NEXT