Kashid Beach Raigad Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raigad: धक्कादायक! रायगडच्या काशिद समुद्रात 4 विद्यार्थी बुडाले, दोघांचा मृत्यू

मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

रायगडच्या काशिद येथील समुद्रात चार शालेय विद्यार्थी बुडाले असून, त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले आहे तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेची सहल रायगड जिल्ह्यात आली असताना, काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर शाळेचे विद्यार्थी पोहोचले त्यावेळी ही घटना घडली. औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालयाचे हे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

(Four Students Drowned at Raigad's Kashid Beach, Two died)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल रायगड येथे आली. दरम्यान काशिद समुद्र किनाऱ्यावर आल्यांनतर चार विद्यार्थी समुद्रात बुडाले. चारपैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं तर, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आल्यानंतर त्यांना अलिबाग येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

प्रणय कदम, रोहन संतोष बेडवाल, कृष्णा विजय पाटील आणि तुषार हरीभाऊ वाघ हे चार विद्ययार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले होते. कृष्णा पाटील आणि कृष्णा वाघ यांना वाचविण्यात यश आले आहे. प्रणय कदम आणि रोहन संतोष बेडवाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT