उल्हासनगर, ठाणे येथे एका पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून, (Ulhasnagar Slab Collapse) ढिगाऱ्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. मयत झालेल्यामध्ये एकाच परिवारातील तीन जणांचा समावेश आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून, एनडीआरएफच्या (NDRF) टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.
सागर ओचानी (19 वय), रेणू धोलांदास धनवानी (55 वय), धोलानदास धनावनी (58 वय) आणि प्रिया धनवानी (24 वय) असे या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.
या इमारतीत किती जण राहत होते किंवा अपघात घडला त्यावेळी किती जण होते. याबाबत निश्चित माहिती नसल्यामुळे ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर, ठाणे कॅम्प पाच येथील ओटी सेक्शन भागात मानस टॉवर ही पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत काहीजण जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. सहा जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. सध्या तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मानस टॉवर इमारत उल्हासनगर महापालिकेकडून (Ulhasnagar municipal corporation) धोकादायक घोषित करून संपूर्णपणे रिकामी केली होती. तरीही काहीजण लपून-छपून या इमारतीत वास्तव्य करत होते.
उल्हासनगर महापालिकेने 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षी सदर इमारत धोकादायक असून तिचे सर्वेक्षण करण्याचे पत्र दिले होते. मात्र तरी देखील रहिवासी या इमारतीत राहत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.