Police Commissioner Sanjay Pandey Dainik Gomantak
महाराष्ट्र

Former Police Commissioner: माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

Police Commissioner Sanjay Pandey: बनावट फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Phone Tapping Case: बनावट फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर NSE कर्मचाऱ्यांचे कॉल बेकायदेशीररित्या रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. पांडे 30 जून रोजी निवृत्त झाले. 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना 4.45 कोटी रुपये दिले.

दरम्यान, तीन व्यक्तींच्या चौकशीच्या आधारे, केंद्रीय एजन्सीने सोमवारी दिल्ली न्यायालयात दावा केला की, एनएसई कर्मचार्‍यांचे फोन टॅपिंग 1997 पासून सुरु आहे. त्यासंबंधीचे पुरावे आणि कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी, सीबीआयने (CBI) 100 कोटींच्या वसुली प्रकरणात पांडे आणि इतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांचीही चौकशी केली होती. या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आरोपी आहेत.

दुसरीकडे, एनएसईमधील आर्थिक अनियमिततेची चौकशी करताना ईडीला सेक्रेट फोन सर्विलांस मिळाले. यानंतर ईडीने (ED) केंद्रीय गृहमंत्रालयाला ही माहिती दिली होती. त्यानंतर सीबीआयला या आरोपांची चौकशी करण्यास सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT