Sameer Wankhede  ANI
महाराष्ट्र

'तुला याची किंमत मोजावी लागेल...', माजी NCB अधिकारी समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सोशल मीडियावर धमक्या आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Sameer Wankhede vs Nawab Malik : मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सोशल मीडियावर धमक्या आल्या आहेत. खरे तर त्यांनी काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना ही धमकी मिळाली.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध कलम 500,501 आणि एससी/एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी समीर वानखेडे यांनी आता गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकी दिल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी पोलिसांना मिळालेला मेसेजही शेअर केला आहे, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यापूर्वीही मलिक यांना धमक्या मिळाल्याचा आरोप

खरं तर, गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये कथित ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात तणाव होता. गेल्या वर्षीही दोघांमधील धमक्यांमुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी दावा केला की एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टार्गेट करू नका अशा धमक्या मिळत होत्या, त्यानंतर नवाब मलिकची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

समीर वानखेडे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप केला होता. सिव्हिल कपडे घातलेले अनेक जण आपला पाठलाग करत असल्याचे समीर वानखेडे यांनी तक्रारीत म्हटले होते. आणि आज पुन्हा समिर वानखेडे यांना धमकी आल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 45 दिवसांत 10 अल्‍पवयीनांची अपहरणे, दक्षिण गोव्यात घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले

Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

Goa Temple Festival: शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा कालोत्सव, 28 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

Gobi Manchurian Ban: डिचोलीत 'गोबी मंचूरियन'वरील बंदी ठरली यशस्वी, 'एफडीए'चा धसका

Goa Tourism: क्रूझ पर्यटन हंगामाला सुरुवात, पहिले जहाज दाखल; 2 हजार पर्यटकांनी घेतले गोवा दर्शन

SCROLL FOR NEXT