Former Mumbai mayor Vishwanath Mahadeshwar Dainik Gomantak
महाराष्ट्र

किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांना अटक

किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. यातच खार पोलिस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटायला गेले होते. तेव्हा शिवसैनिकांकडून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप सौमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली होती. यातच आता मुंबईचे (Mumbai) माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) शनिवारी रात्री खार पोलिस ठाण्यात राणा कुटुंबींयाची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यावेळी शिवसैनिकांकडून घोषणाजी केली. त्यानंतर सोमय्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकण्यात आल्या. यामध्ये सोमय्यांच्या गाडीची काच फुटली. याचवेळी खार पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्यांमध्ये माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर हे सर्वांच्या पुढे होते.

तसेच, खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी भायखळा महिला कारागृहात हलवले आहे. त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. नवनीत राणा यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एफआयआर रद्द करावी, यासाठी नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले असून त्यावर सुनावणी झाली. राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर निदर्शने केली. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्यात देशद्रोहाचा आरोपही जोडण्यात आला. रविवारी मुंबई न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रविवारी रात्री उशिरा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT