Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ने घेतले ताब्यात

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) ताब्यात घेतले आहे. सीबीआयचे पथक त्यांना रिमांडसाठी विशेष सीबीआय न्यायालयात हजर करणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गेल्या वर्षी 21 एप्रिल रोजी देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध चौकशी सुरु केली होती. (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh has been arrested by the CBI in a Rs 100 crore recovery case)

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयला ताब्यात घेण्याच्या विशेष न्यायालयाच्या परवानगीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. देशमुख यांनी सोमवारी अधिवक्ता अनिकेत निकम यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सीबीआय कोठडीच्या याचिकेलाही आव्हान दिले होते.

तसेच, विशेष सीबीआय न्यायालयाने 31 मार्च रोजी सीबीआयने दाखल केलेल्या अर्जाला परवानगी दिली होती. एजन्सीला देशमुख आणि संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

SCROLL FOR NEXT