महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री शंकरराव कोल्हे (Shankarrao Genuji Kolhe) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 4:30 वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने कोपरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे सासरे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आजोबा होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. (Former Co-operation Minister Shankarrao Genuji Kolhe passes away)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव सारख्या छोट्याशा खेडेगावातून ग्रामीण जीवनाचा अनुभव असल्याने त्यांनी धाडसाने सर्वच क्षेत्रात काम केले आहे. त्यांनी अनेक काळ कोपरगावचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. अलीकडेच त्यांनी राज्याच्या राजकारणापासून अलिप्त झाले. पण त्यांची सून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बीजेपीमध्ये प्रवेश करून गेल्या सरकारच्या काळात कोपरगावचे प्रतिनिधित्व केले होते. यामुळे त्यांचा भाजप पक्षाशी संबंध आला. (Shankarrao Kolhe News)
कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. 1960 मध्ये त्यांनी संजीवनी सहकरी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्थाची स्थापना करून त्यांनी सक्षमपणे चालविल्या.तसेच शिक्षण क्षेत्रात खिल त्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे. त्यांनी गरमिन भागातील विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षणाची सोय करून दिली. शंकरराव कोल्हे कोपरगावचे सहा वेळा आमदार राहिले आहे. या कार्यकाळात त्यांनी उत्पादन शुल्क, परिवहन, महसूल, कृषी या खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण यासारख्या विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी येसगावचे सरपंच ते मंत्री पदासारखे अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी विविध विषयावर पुस्तके लिहिले आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी परदेश दौरे केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.