Konkan Floods Twitter/@ANI
महाराष्ट्र

Konkan Floods: पुराचा कहर थांबेल पण डोळ्यातल्या अश्रूंचा पूर कसा थांबणार

पावसाने कोकणात रौद्ररूप दखावलं. घर रस्त्यावर आली, गेले 2 दिवस जे मिळत आहे ते खावून लोकं जगत आहे. मात्र पाणी ओसरल्य़ा नंतर येणाऱ्या महमारीचं काय?

दैनिक गोमन्तक

येवा कोकण संकटाच्या भोवऱ्यात आहे. आधी निसर्ग नंतर तौकते आणि आता जलप्रलय. ज्या वादळामुळे कोकणात (Konkan Monsoon) अतोनात नुकसान झाले होते त्यातून सावरत असतानाच पावसाने कोकणवासीयांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. (Floods disrupt life in Konkan)

कोकणात गेल्या काही दिवसापासून सतत धुवाधार पाऊस कोसळतोय. कोकणात आता असा एकही जिल्हा राहिला नाही जिथे या पावसाने आपले रौद्र रूप दाखवले नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड यासारख्या अनेक जिल्ह्यात आणि गावागावात गेल्या काही दिवसापासून पावसाने कहर केला आहे. कोरोनाच्या कहरातून कोकण काही प्रमाणात बचावला होता. मात्र या पावसाने कोकणवासियांवर नैसर्गिक संकट ओढवले आहे.

कोकण भागात गुरुवारी पावसाने आपले रौद्ररूप दाखवले. कोकणाच्या अनेक भागात काल दरडी कोसळणे तसेच नद्यांना महापूर येणे असे चित्र दिसून आले. रायगड मध्ये एका गावात दरड कोसळून 38 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर दुसऱ्या बाजूला चिपळूण मध्ये कोरोना हॉस्पिटलमध्ये पाणी शिरल्यामुळे आठ जणांचा मृत्यु झाला आहे.

बघूया कोकणवासी याबद्दल काय बोलतात

चिपळूण येथील महेश परब सांगतात,"दरवर्षी आम्ही पावसाचा सामना करत असतो. या वर्षी मात्र पावसाने आम्हाला रौद्ररूप दखावलं. आमचं घर रस्त्यावर आलं, गेले 2 दिवस आम्हाला जे मिळत आहे ते खातो आहे. मात्र पाणी ओसरल्य़ा नंतर येणाऱ्या महमारीचं काय."

"देवाने प्रलय दाखवला मात्र आम्हाला तरी कशाला जगयला ठेवल. जिथे आमचे संसारच उद्ध्वस्त झाले तिथे आम्ही जगून काय करायचं. पै पै ने जमा केलेल्या सर्व गोष्टी पाण्यात वाहून गेल्या. शासन मदत करेल अशी अपेक्षा आहे," असं मत महाड मधून एका रहिवाशी यांनी मांडलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT