Mumbai News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai News: गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग, 6 कारसह आठ दुचाकी जळून खाक

गिरगाव येथील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली.

दैनिक गोमन्तक

मुंबईतील गिरगाव येथील नवाकाळ वृत्तपत्राच्या कार्यालयला लागूनच असलेल्या पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत पाच ते सहा मोटार कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर या कंपाउंडमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे कपडे, प्लास्टिक आणि नायलॉनचे रोल जळून खाक झाले आहेत. तसेच बाजूच्या दोन घरांनाही आग लागली आहे. फटाक्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • जीवितहानी नाही मात्र नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे

मध्यरात्रीच्या सुमारास पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, पाच ते सहा कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच तिथे राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. फटाक्यांमुळेच ही आग लागल्याची शक्यता आहे

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमाक दलाच्या जवानांनी अनेक गाड्या बाहेर काढण्यात यश मिळवले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमाक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे या आगीमुळे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT