Varsha Patil Dainik Gomantak
महाराष्ट्र

Video: देश प्रथम! 10 महिन्यांच्या चिमुकलीला सोडून कोल्हापूरची रणरागिणी निघाली सीमेवर...

Indian Army: आपल्या देशात खरे कर्तव्य कोण बजावत असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक आहेत. सीमेवर तैनात असलेले जवान आपल्या घरापासून दूर राहतात.

Manish Jadhav

Indian Army: आपल्या देशात खरे कर्तव्य कोण बजावत असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक आहेत. सीमेवर तैनात असलेले जवान आपल्या घरापासून दूर राहतात.

आपल्या सुरक्षेसाठी ते सीमेवर तैनात आहेत. विशेष म्हणजे, ते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले रक्षण करतात.

आपल्या जीवनात त्यांचे योगदान फार मोठे आहे, ज्याची परतफेड कधीही केली जाऊ शकत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की आज आम्ही तुमच्याशी सैनिकांबद्दल का बोलत आहोत?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचे डोळे पानावतील.

10 महिन्यांची मुलगी सोडून देशसेवेसाठी बाहेर पडली

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला सैनिक ट्रेनच्या गेटवर उभी असल्याचे दिसत आहे. या महिला सैनिकाचे नाव वर्षा पाटील असे आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. त्याचवेळी, वर्षा यांचे कुटुंबीयही दिसत आहे. त्या आपल्या प्रियजनांपासून दूर जात आहे.

व्हिडीओबाबत असाही दावा केला जात आहे की, वर्षा या 10 महिन्यांच्या मुलीला सोडून ड्युटीवर जात आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ड्युटीवर जात असताना वर्षा यांचे कुटुंबीय रेल्वे (Railway) स्टेशनवर सोडण्यासाठी आले आहे. असा क्षण तुमच्याही आयुष्यात अनेकदा आला असेल, जेव्हा तुम्हीही तुमच्या घरापासून दूर गेला असाल.

10 महिन्यांच्या बाळाला सोडून ती भारत मातेची सेवा करण्यासाठी जात आहे

हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. यूजर्सने व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, "हृदयस्पर्शी क्षण, एक आई तिच्या 10 महिन्यांच्या बाळाला सोडून भारत मातेची सेवा करण्यासाठी जात आहे." हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही तूफान व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jeffrey Epstein Death: जेफ्री एपस्टीनचा मृत्यू आत्महत्या नव्हे, तर खून होता! 7 वर्षांनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ; पाठीमागून हल्ला करुन गळा आवळल्याचा संशय

Unlucky Zodiac Sign: ग्रहांच्या उलट्या चालीने उडणार 4 राशींची झोप! नशिबाची साथ मिळण्यात येणार अडचणी; प्रत्येक कामात येऊ शकतात विघ्न

Under 16 Cricket: 150 चेंडूंची भक्कम भिंत! वंश कुडतरकरच्या नाबाद 59 धावांनी गोव्याला तारले

FC Goa: एफसी गोवाला मिळाला नवा कोच! स्पेनच्या आंजेल बियादेरो यांनी स्वीकारली सूत्रे, 21 नोव्हेंबरला पहिली कसोटी

Turtle Nesting Beaches: गोव्यातील 24 समुद्रकिनाऱ्यांना मिळणार कासवांसाठी संरक्षण! सीआरझेड अधिसूचनेत समावेशाची मागणी

SCROLL FOR NEXT