ओरोस: हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी (१३ मे) सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात घडला. या अपघातात एक तरूण आणि तरूणी जागीच ठार झाले आहेत, तर अन्य आठ जण जखमी झाले आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची ओळख पटली आहे. अनुष्का अनिल माळवे (वय १८) आणि विनायक मोहन निलेकर (वय २२) अशी या अपघातात मृत्यु झालेल्यांची नावं आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर इनोव्हा कार, मोटारसायकल आणि डंपर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील अनुष्का आणि विनायक या दोघांचा डंपरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला.
या घटनेत शोरूमच्या सिक्युरिटी गार्डसह इनोव्हा कारमधील आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघाताचा अधिक तपास सिंधुदुर्ग पोलिसांकडून सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, लोकांनी आपली कडक सुरक्षा व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.