Farmer
Farmer Dainik Gomantak
महाराष्ट्र

बळीराजाला आता घर बसल्या आपल्या पिकांचे करता येणार रजिस्ट्रेशन

दैनिक गोमन्तक

मुंबई: भारत (India) देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील जवळजवळ 65% लोक शेतीवर (Agriculture) अवलंबून आहेत. या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून (Government) एक आनंदाची तेवढीच महत्वाची बातमी आहे. सध्या शेतजमीनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिमुसळधार पाऊस यामुळे होणारे नुकसान याची नोंद करणे सोपे होते. या नोंदणीच्या (Registration) आधारेच शेतकऱ्यांना कर्ज देखील दिले जाते. परंतु , दोन ते तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने, पीकाची पाहणी करून त्याची व्यवस्थीत नोंद (Registration) केली जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून कायम केली जात होती. म्हणूनच आता महसूल विभागाने पिकांची रिअल टाइम नोंद (Registration) करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एका अॅपची (App) निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

टाटा ट्रस्टच्याने या अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपमध्ये शेतकरी त्यांच्या पिकांची माहिती भरतील. तसेच तलाठी पिकांच्या नोंदनीची तपासणी करतील. त्यामुळे पीक पेरणीची रियल टाइमची माहिती अॅपमध्ये एकत्रित होणार आहे. ही माहिती पारदर्शकरित्या एकत्रित येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविला आहे. यामुळे पीक विमा तसेच पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सोपी होईल. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास देखील मदत होईल. पुर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तिमुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर योग्य ती भरपाई देणे शक्य होणार असे थोरात यांनी सांगितले.

ई पीकद्वारे पाहणी होत असल्याने राज्यातील पिकांचे क्षेत्र समजणार आहे. यामुळे राज्यामधील आर्थिक पाहणीसह कृषी नियोजन करणे देखील सोपे होणार. ही ई नोंदणी प्रोजेक्ट याआधी वीस तालुक्यात राबविला होता. यातून मिळालेल्या यशामुळेच ही पद्धत राज्यभर राबविण्याचा निर्णय थोरात यांनी घेतला. यासंदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. तसेच ई पीक पहाणी ही प्रोजेक्टची यशस्वी अमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय, विभागीय जिल्हा स्तरीय तसेच तालुका स्तरीय नियंत्रण समिति तयार केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT