nawab malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

फडणवीस तुम्हाला दिवाळी नंतर बॉम्ब फोडण्याची गरज नाही; नवाब मालिकांचा टोला

वानखेडे मला थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वसुली गॅंग चा पडदा आता समोर येतोय आणि हे होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

जी माणसे महिलांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्याच्या घरी महिला आहे का नाही? यांच्या घरातील महिला या महिला असतात आणि बाकीच्यांच्या घरातील महिला या महिला नाहीत का? मी काल जे आरोप केले ते मी पुराव्यानिशी केले होते. असे नवाब मलिक पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले त्यानंतर ते माफी मागत नाहीत असे म्हणाले. किरीट सोमय्या हे अजित पवार यांच्या घरातील महिलांवर बोलले. संजय राऊत यांच्या पत्नीवर देखील बोलले. तसेच फडणवीस काल म्हणाले नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्स मिळाले यावर बोलले. परंतु काय मिळाले का? फडणवीस आणि वानखेडेंचे जवळचे संबंध आहेत मग देवेंद्र फडणवीसजी तुम्ही त्यांनाच विचारा माझ्या जावयाच्या घरी ड्रग्स सापडला का? माझ्या जावयाच्या घरी कोणतेही ड्रग्स सापडले नाही असे नवाब मलीक म्हणाले.

तसेच, मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण जनतेच्या हितासाठी दिला होता. भ्रस्टाचार झाला होता माझ्यावर आरोप केले होते. मी कोर्टच्या आदेशाला नाकारले होते. कोर्टाचा अवमान केला होता. त्यानंतर तो खटला त्याच कोर्टात गेला. तरीही आम्ही सर्व माहिती कोर्टाला दिली. कोर्टाचा त्यानंतर निकाल आला.आणि 2012 ला मी परत मंत्री झालो. मी जे आदेश दिले होते तेच बरोबर आहेत असे कोर्टाने दिली.

फडणवीस तुम्हाला दिवाळी नंतर बॉम्ब फोडण्याची गरज नाही मी आताच फोडणार आहे. कोणी मायकलाल नाही जो माझ्या वर आरोप करेल. माझ्या कोणत्याही ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही. मी तुमच्या भावाच्या बाबतीत माहिती दिली होती. तो कुठे फिरतो काय करतो. याबाबदल सांगितले होते, असे नवाब मलिक म्हणाले.

वानखेडे जेव्हा विभागात आले तेथून स्वतःची प्रायव्हेट आर्मी तयार केली आहे. के.पी. गोसावी, सॅम डीसोजा यांचा समावेश त्यांनी केला आहे. आर्यन खानच्या बाबतीत 18 करोडची मागणी केली आहे. सॅम डिसोझा आता समोर आला आहे. गोसावी त्या दिवशी एनसीबीकडे काय करत होते. सर्व फर्जीवाडा समीर वानखेडेनीच केला आहे. चित्रपटातील काही कलाकारांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. यामध्ये सारा अली खान, दीपिकाला चौकशीसाठी बोलावले होते. यातून हजारो करोड त्यांच्या कडून उकळले गेले. समीर वानखेडे लाखोंचे कपडे वापरतो. रोज दोनलाखांचे बूट घालतात. इमानदार लोकांची जीवनशैली समीर वानखेडे सारखी असावी. समीर वानखडे यांनी आजवर हजारो कोटी उकळले आहेत असा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, अनिल देशमुख यांच्याविषयी मलिक म्हणाले की, अनिल देशमुख काल ईडीच्या कार्यालयात गेले. त्यांना फसवले गेले आहे. अनिल देशमुख यांना त्रास दिला गेला. त्यांच्यावर आरोप करणारा पळून गेला आहे आणि ज्याच्यावर आरोप आहे त्यांना अटक केली आहे. परमबीर सिंग कुठे आहे हे सांगण्याची जबाबदारी केंद्राची आहे. ते त्यांनी सांगावी. लूक आउट नोटीस देऊन देखील परमबीर सिंग पळाले की त्यांना पळवले याचे उत्तर द्यावे लागेल. असा सवाल मालिकांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT