Pune Maharashtra: सकाळ माध्यम समूहाने डिजिटल पत्रकारितेत आपली वेगळी ओळख निर्माण करत २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. प्रिंट माध्यमापासून डिजिटल विश्वापर्यंत सकाळनं आपला ठसा उमटवला आहे. दरम्यान, ई-सकाळनं आणखी एक मोठं यश संपादन केलं आहे.
कॉमस्कोअरच्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये ई-सकाळ हे सर्वाधिक वाचलं जाणारं मराठी संकेतस्थळ ठरलं आहे. भारतातील डिजिटल क्रांतीने प्रादेशिक भाषांमध्ये ऑनलाइन कंटेंटच्या मागणीत प्रचंड वाढ केली आहे.
इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे भारतीय भाषांमध्ये वाचकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही मराठीत ऑनलाइन वाचनाची आवड मोठ्या प्रमाणात वाढली असून, विश्वासार्ह बातम्यांसाठी लोक "ई-सकाळ"ला प्राधान्य देत आहेत.
ई-सकाळ हे वेब पोर्टल २६ जानेवारी २००० रोजी सुरू झाले आणि तेव्हापासून आज २०२५ पर्यंत सकाळ माध्यम समूहाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. ई-सकाळमध्ये साम टीव्ही, दैनिक गोमन्तक, ॲग्रोवन या इतर वेब पोर्टलचाही समावेश आहे.
साम टीव्ही: मराठी न्यूज चॅनेल असलेल्या साम टीव्हीनं डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आपली ओळख निर्माण केली आहे. ब्रेकिंग न्यूज, विश्लेषणात्मक कार्यक्रम, डिजिटल व्हिडीओ आणि थेट प्रसारण यामुळे साम टीव्हीचे वेब पोर्टल लोकप्रिय ठरले.
दैनिक गोमन्तक: गोव्याच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भर देणारे "गोमन्तक" हे सकाळचं वेब पोर्टल आहे. गोव्याच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि पर्यटनविषयक बातम्यांसाठी हे एक विश्वासार्ह वेब पोर्टल आहे.
ॲग्रोवन: आधुनिक शेती, हवामान अंदाज, कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन अशा विषयांवर ॲग्रोवन पोर्टल सतत अद्ययावत माहिती पुरवते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.