El Nino Heavy Rainfall Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

El Nino Heavy Rainfall Maharashtra: जुलैमधील अतिवृष्टीला 'एल निनो'च कारणीभूत; मॉन्सूनचा प्रवाह क्षीण असताना समुद्रावरील बाष्पामुळे उंच ढगांची निर्मिती

Konkan Heavy Rainfall: महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील उमरगाम येथे २३ जुलैला २४ तासांत १०६४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पुणे: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे अरबी समुद्रावरील बाष्पासोबत प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची स्थिती कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण हवामान शास्त्रज्ञांनी दिले आहे. राज्यात मॉन्सून काळात कमी वेळात जास्त पावसाच्या घटना वाढत असून, या घटनांचा कल लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील उमरगाम येथे २३ जुलैला २४ तासांत १०६४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. त्याआधी जुलैच्या पहिल्या आठवड्यात लोणावळा येथे दोन दिवसांत १२०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. हंगामात तयार झालेल्या फक्त दोन कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे कोकणात आतापर्यंत सरासरीपेक्षा तीन टक्के जास्त; तर मध्य महाराष्ट्रात २२ टक्के जास्त पाऊस नोंदला गेला आहे.

याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागातील (आयएमडी) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मेधा खोले म्हणाल्या, ‘‘मॉन्सून काळात सर्वसाधारणपणे उंच ढग तयार होऊन कमी वेळात जास्त पावसाच्या घटना घडत नाहीत. मात्र, गेल्या दशकात राज्यात मॉन्सून काळात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. उंच ढग तयार होण्याची प्रक्रिया (कन्व्हेक्शन) सर्वसाधारण कालावधीपेक्षा दीर्घकाळ सुरू राहिल्यामुळे पावसाचे आकडे अपवादात्मक (एखाद्या ठिकाणी आतापर्यंत नोंदल्या गेलेल्या सर्वाधिक पावसापेक्षा जास्त) पातळीवर पोहचत आहेत.’’

‘अतिवृष्टीच्या अंदाजाचा विचार व्हावा’

‘‘१९५० पासून उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रासह मध्य भारतातील तीव्र हवामानाच्या घटनांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. येत्या काळात कमी वेळात जास्त पावसाच्या घटनांची वारंवारता वाढण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन व पायाभूत सुविधांचा विकास करताना शासनाने पुढील ५० वर्षांत त्या भागात सर्वाधिक किती पाऊस पडू शकतो, याचा अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे,’’ असे मत ‘आयआयटीएम’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी कोल यांनी व्यक्त केले.

दोन ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात आज हंगामातील पहिले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मंगळवारी दुपारी हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालदरम्यान हल्दियाजवळ किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे कोकण किनारपट्टीजवळ सहा किमी उंचीवर वाऱ्यांची चक्रीय स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात दोन ऑगस्टपर्यंत, मराठवाड्यात ३१ जुलैपर्यंत; तर विदर्भात २८ जुलै ते एक ऑगस्टदरम्यान सर्वदूर पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT