Eknath Shinde Twitter/ @ANI
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Government Formation: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज सकाळी राजभवनात पोहोचले. यावेळी त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला. जो राज्यपालांनी स्वीकारला. राज्यपालांनी दोन्ही नेत्यांना मिठाई खाऊ घातली. तत्पूर्वी एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत आले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तिथे अर्धा तास थांबल्यानंतर दोन्ही नेते राजभवनात पोहोचले. सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनात संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा फडणवीसांनी PC मध्ये बोलताना केली. (Eknath Shinde become in maharashtra chief minister)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ''2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला मतदान केले, मात्र त्यावेळी जनादेशाचा अवमान झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. बाळासाहेब काँग्रेसच्या विरोधात राहिले, परंतु उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले.''

'जनतेला भाजप शिवसेनेचे (Shiv Sena) सरकार हवे होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्राधान्य दिल्याचे फडणवीस म्हणाले. 'हे सरकार (महा विकास आघाडी) आपला कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही, असे मी तुम्हाला सांगितले होते.'

नवाब मलिकांबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) दाऊदला आयुष्यभर विरोध केला, मात्र उद्धव ठाकरेंनी दाऊदशी संबंधित व्यक्तीला मंत्री केले. तुरुंगात गेल्यानंतरही त्यांना मंत्रीपदावरुन हटवण्यात आले नाही.'' देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, 'एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, शपथविधी सोहळा संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT