Sanjay Raut Arrested twitter
महाराष्ट्र

Sanjay Raut ED Custody: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ

ईडीकडून 8 दिवसांच्या कोठडी मागणी

दैनिक गोमन्तक

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरी ईडी कारवाई करत अनेक ठीकाणी तपासणी सुरु केली आहे. या मूद्यावरुन गेले कित्येक दिवस महाराष्ट्रात शिवसैनिकांनी या कारवाईचा निषेध करण्यासाठी आंदोलने ही सुरु केली आहेत. असे असले तरी खासदार संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्याकडून 1 कोटी 6 लाख रुपये मिळाल्याचा दावा ईडीनं केला. ईडीनं संजय राऊत यांची 8 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, विशेष न्यायालयानं त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

( ED Arrest Sanjay Raut due to Patra Chawl scam case and claimed one crore from Pravin Raut )

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणात ईडीनं अटक केली. आज विशेष पीएमएलए कोर्टात त्यांना हजर केल्यानंतर 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. ईडीकडून विशेष सरकारी वकील हितेन वेनेगावंकर यांनी युक्तिवाद केला.

यावेळी त्यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला लाभ झाला असून याचा समावेश गुन्ह्यात होतो, असा युक्तिवाद केला. प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांच्या भारतातील आणि परदेशातील प्रवासासाठी पैसे खर्च केले असल्याचा दावा केला. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात 1 कोटी 6 लाखांची रक्कम आल्याचा दावा ईडीनं न्यायालयात केला गेला आहे.

बाळासाहेबांचे संजय राऊत सच्चे शिवसैनिक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत कोणत्याही दबावालाबळी पडले नाहीत त्यामुळं त्यांचा अभिमान वाटतो, असं म्हटलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संजय राऊत सच्चे शिवसैनिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. संजय राऊत यांनी काय गुन्हा केला आहे. ते पत्रकार आहेत, शिवसैनिक आहेत ते बेधडकपणे केंद्राविरोधात बोलतात त्यामुळं ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

त्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेत दिलासा दिला. तसेच संजय राऊत यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर शिवसैनिकांनी आज देखील राज्यभरात आंदोलन केलं यात कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, सातारा, नाशिक, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: "फोंड्यात आमचा रितेश नाईकनाच पाठिंबा"! ढवळीकरांची ठाम भूमिका; भाटीकरांच्या पक्ष प्रवेशाबाबत केले मोठे विधान

Goa Zilla Panchayat: उत्तर, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत अध्यक्ष उपाध्‍यक्षांची नावे जाहीर; 7 जानेवारीला घेणार पदांचा ताबा

Goa Politics: 'मनोज परब असे कोण आहेत, ज्यांनी कॉंग्रेसला उपदेश करावा'? चोपडेकर यांचा हल्लाबोल; जनतेची दिशाभूल केल्याचे आरोप

Job Scam: सांगितले हॉंगकॉंग नेले कंबोडियात! नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; मर्चंट नेव्हीच्या नावाखाली उकळले 8 लाख

Goa Education: 11 वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! उच्च माध्‍यमिक विद्यालये बनवणार प्रश्नपत्रिका; प्रश्‍‍नांची बँक येणार वापरात

SCROLL FOR NEXT