Earthquake Dainik Gomantak
महाराष्ट्र

Earthquake in Nashik: नाशिकमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; 3.6 रिश्टर स्केलची नोंद

दैनिक गोमन्तक

Earthquake in Nashik: आज सकाळी म्हणजेच 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सकाळी 4 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.

  • रुणाचलमध्ये भूकंपाचे धक्के
    दरम्यान, अरुणाचल प्रदेशात आज सकाळी 7 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3. 8 मोजली गेली आहे. भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होती. अरुणाचल प्रदेशातील बसरपासून उत्तर-पश्चिम-उत्तर 58 किमी अंतरावर भूकंप झाला. 

  • भूकंप कसे होतात?
    भूकंप होण्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीच्या आतील प्लेट्सची टक्कर. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स कधीतरी आदळतात तेव्हा तेथे फॉल्ट लाइन झोन तयार होतो आणि पृष्ठभागाचे कोपरे दुमडलेले असतात. पृष्ठभागाच्या कोपऱ्यामुळे, तेथे दाब तयार होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते, ज्यामुळे पृथ्वी हादरते आणि आपण त्याला भूकंप मानतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT