E-Sakal Comscore Ranking
ई-सकाळ डॉट कॉमने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट पत्रकारितेची आणि डिजिटल माध्यमातील वर्चस्वाची मोहोर उमटवली आहे. कॉमस्कोअरने जाहीर केलेल्या मे 2025 च्या ताज्या अहवालानुसार, ई-सकाळ ही भारतातील सर्वाधिक वाचली जाणारी मराठी न्यूज वेबसाइट ठरली आहे. १.६५ कोटी युनिक व्हिजिटर्स या महिन्यात मिळवून ई-सकाळने इतर सर्व मराठी डिजिटल माध्यमांवर स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं आहे.
कॉमस्कोअर ही जगभरातील डिजिटल मीडिया आणि वेब ट्रॅफिक विश्लेषण करणारी प्रतिष्ठित संस्था आहे. त्यांच्या अचूक मोजमापांनुसार, ई-सकाळने केवळ युनिक व्हिजिटर्समध्येच नव्हे, तर वाचकांचा दैनंदिन सहभाग, कंटेंट एंगेजमेंट आणि सर्च रँकिंगमध्येही आघाडी घेतली आहे.
ई-सकाळ डॉट कॉमवर ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, व्हिडिओ रिपोर्ट्स, तसेच सखोल विश्लेषण सातत्याने प्रसिद्ध केलं जातं. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्यांव्यतिरिक्त, क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान, लाईफस्टाईल, आरोग्य, शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांतील बातम्याही इथे वाचकांना मिळतात.
ई-सकाळने केवळ मोठ्या शहरांतीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील वाचकांनाही समाविष्ट करत डिजिटल माध्यमाच्या सर्वांगीण वापरातून हे यश संपादन केलं आहे. त्यांच्या वेब पोर्टलसोबतच मोबाईल अॅप, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि ई-पेपरच्या माध्यमातूनही मराठी वाचकांशी सतत संपर्क राखण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
ई-सकाळच्या यशामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे नव्या तंत्रज्ञानाचा याेग्य वापर आणि वाचकांच्या गरजांची अचूक जाण. बातम्या केवळ दिल्या जात नाहीत, तर त्या सोप्या भाषेत, विश्वासार्हतेसह आणि विश्लेषणासह वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातात.
ई-सकाळचं हे यश संपूर्ण मराठी समाजासाठी अभिमानाचं ठरत आहे. एका मराठी न्यूज पोर्टलने राष्ट्रीय स्तरावर इतकं मोठं स्थान मिळवणं ही मराठी माध्यमविश्वासाठी उल्लेखनीय गोष्ट आहे.