Ganeshotsav 2021 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ganeshotsav 2021: मुंबईत 144 कलम लागू

10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत शहरामध्ये 144 कलम लागू असणार आहे. यासंबंधीचे आदेश मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) जाहीर करण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

राज्यात कोरोनाचा (Covid 19) धोका कमी झालेला नसताना राज्य सरकारने (State Government) कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये (Mumbai) गणेशत्सवादरम्यान जमावबंदीचे (Curfew) आदेश लागू करण्याचे देण्यात आले आहेत. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत शहरामध्ये 144 कलम लागू असणार आहे. यासंबंधीचे आदेश मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) जाहीर करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून आता सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना गर्दी करता येणार नाही. राज्यात गणेशत्सव मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी ठाकरे सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी गणपती बप्पाचे दर्शन घेण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यावरही रोख लावण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू नये यासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर मुंबईसह अन्य शहरांमध्ये दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. गणेशत्सवाच्या काळामध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची भिती ठाकरे सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. मागील वर्षी ऐन सणासुदीच्या काळामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. याच पाश्वभूमीवर पुन्हा एकदा हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकिमध्ये येत्या काळात येणाऱ्या सणासुदीच्यावेळी होणारी गर्दी टाळता येईल, यावर प्रदिर्घ अशी चर्चा झाली होती.

सार्वजिनक गणेश मंडळांसाठी नियमावली

राज्यातील सार्वजनिक मंडळांना आगमन आणि गणपती विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्तीच्या प्रत्यक्षदर्शन आणि मुखदर्शनास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक, सोशलस मिडियाद्वारे सार्वजनिक मंडळांना गणपती बप्पाच्या दर्शनाची सोय करावी लागणार असल्याचे नियमांमध्ये उल्लेखित केले आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यत वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशत्सवारही कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे गणेशत्सव साजरा करताना सार्वजिनक मंडळांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. मागील वर्षी मुंबई पालिकेने सार्वजिनक मंडळांना जे कोरोना नियम यंदाच्या वर्षी लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही प्रशासनाने नव्याने कोरोना नियमावली तयार केली आहे. सार्वजिनक मंडळांबरोबरच शासनाने घरगुती गणेशमूर्ती आणऱ्यांकरिता ही नियमावली आता बंधनकारक करण्यात आली आहे. घरगुती गणपती बप्पाची मूर्ती दोन फुटांपेक्षा, तर सार्वजनिक उत्सवातील मूर्तीही चार फुटांपेक्षा उंच नसावी असा नियमही कायम ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT