महाराष्ट्र

Mumbai NCB : गोवा, मुंबईत वितरीत करण्यासाठी आणलेले 8 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त

Akshay Nirmale

Mumbai NCB : मुंबई आणि गोव्यात वितरणासाठी आणलेले चार किलो चरस मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ने जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या अमली पदार्थांची किंमत 8 लाख रूपये इतकी आहे. नवीन वर्षाच्या पार्ट्यांमध्ये वापरण्यासाठी हे अंमली पदार्थ मागविण्यात आल्याचा संशय आहे.

अमली पदार्थ स्थानिक वितरकाला पोहोच करण्यासाठी एकजण मुंबईत येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे हे अंमली पदार्थांचे रॅकेट सुरू असून या नेटवर्कमधूनच हे अमली पदार्थ आले होते. भारतातील विविध राज्यांमध्ये हे अमली पदार्थ पाठवले जातात.

NCB ने दिलेल्या माहितीनुसार 27 डिसेंबर रोजी एम. कुमार हा अमली पदार्थ घेऊन ठाणे रेल्वे स्थानकावर येणार होता. तर मुंबईतील ए. सी. अयाज याच्याकडे हे पार्सल दिले जाणार होते. एनसीबीच्या पथकाला ही माहिती मिळाल्यानंतर पथक ठाणे रेल्वे स्थानकावर गेले आणि त्यांनी परिसरात पाळत ठेवली होती. मध्यरात्री ट्रेन आल्यावर, NCB अधिकार्‍यांनी माहिती तपशील आणि प्रोफाइलिंगच्या आधारे ड्रग देणारा आणि स्विकारणारा यांची ओळख पटवून दोघांनाही अटक केली.

एनसीबी अधिकार्‍यांना एम. कुमार याच्या पिशवीतून तपकिरी टेपमध्ये गुंडाळलेली 16 पाकिटे सापडली. त्यात चरस आढळून आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ताज्या जप्तीमुळे आंतर-राज्य ड्रग सिंडिकेटला एक मोठा धक्का बसला आहे. सणासुदीच्या काळात आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या आधी अशा अमली पदार्थांचा ओघ वाढत असतो. ड्रग सर्किट विविध स्त्रोतांकडून पार्टी आणि सुट्टीच्या ठिकाणांवर, विशेषत: मुंबई आणि गोवा भागात हे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात वितरीत केले जात असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: सहा लाखांचा माल जळून खाक; मोलेत बर्निंग ट्रकचा थरार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT