Draft Women Policy In Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

महिला धोरणाचा मसुदा शिवरायांच्या चरणी अर्पण

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती त्यावर देखरेख करणार आहे तर महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष राहिल.

दैनिक गोमन्तक

बहुचर्चित असा राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा मसूदा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच भवानी मातेच्या चरणी अर्पण केला. हा मसुदा प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाची प्रत आज अर्पण केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. (Adv, Yashomati Thakur Presented the draft Women Policy in Maharashtra)

"स्त्रियांना समानतेची न्यायाची वागणूक देणारे स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची " प्रतिक्रिया ॲड. ठाकूर (Yashomati Thakur) यांनी यावेळी व्यक्त केली. त्यापूर्वी स्वराज्याचे कुलदैवत असलेल्या भवानीमातेच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा केली. राज्यातील समस्त महिलांच्या कल्याणाचे आणि रक्षणाचे साकडेही आई भवानी मातेकडे घालून ॲड. ठाकूर यांनी प्रतापगडावर शिवध्वजारोहण केले.

महिला धोरण आणणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. मात्र, आता त्यात आणखी भर होउण 'महिला धोरणाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य' अशी ही महाराष्ट्राची ओळख नवीन धोरणामुळे होणार आहे. या धोरणात महत्वाचे म्हणजे महिलांसोबत LGBTQIA+ ( इतर लिंगी समुदाय ) समुदायाचा आवर्जून या धोरणात समावेश केलेला आहे. असा समावेश असलेले हे बहुधा देशातील पहिलेच धोरण आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

महिला धोरण हे केवळ कागदावरच राहणार नाही, तर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती त्यावर देखरेख करणार आहे. शिवाय महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स ही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष राहिल तसंच, या धोरणात आखून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता ही युद्धपातळीवर होऊ शकेल. या धोरणामुळे या जेंडर बजेटची संकल्पना ही अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

प्रतापगडच का निवडला?

येथे देशाला आधुनिकतेचा विचार देणाऱ्या पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) हस्ते प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. शिवछत्रपतींनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात महिलांना सदैव सन्मानाची वागणूक मिळाली. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन केले जाई. ईतकेच नही तर स्वतः महाराजांनी वेळोवेळी आपल्या वर्तणुकीतून महिलांच्या बाबतीत आदर्श घालून दिलेला आहे.

शिवछत्रपती ते आजचा भारत व्हाया नेहरू असा भारताच्या पुरोगामीत्वाचा हा प्रवास आहे. या प्रवासाची आठवण म्हणून प्रतापगडाची निवड करण्यात आली असल्याचं मत ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगीतले. महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कुबले, अर्थ व शिक्षण सभापती मानसिॅगराव जगदाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अनेक शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT