Doctors of Mumbai's Sion hospital Twitter/ @ANi
महाराष्ट्र

डॉक्टर-नर्सला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल मात्र कारवाई नाही

मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध सायन हॉस्पिटलमध्ये (Sion hospital) डॉक्टर आणि नर्सला एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई : मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध सायन हॉस्पिटलमध्ये (Sion hospital) डॉक्टर आणि नर्सला एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या मारहाणीचा डॉक्टरांनी कँडल मार्च (Candle March) काढून निषेध व्यक्त केला आहे. काल रविवारी रात्री सायन हॉस्पिटल परिसरात मेणबत्ती हातात धरुन मार्च काढत डॉक्टरांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा संपावर जाण्याचा इशाराही मोर्चात सहभागी असलेल्या डॉक्टरांनी दिला. (Doctors of Mumbai's Sion hospital take out a candle march)

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय अर्थात सायन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स यांना बेदम मारहाण केली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारच्या रात्री 65 वर्षीय प्यारेलाल गुप्ता यांना उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. डॉक्टरांनी त्वरीत उपचार सुरु केले, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर मारहाण केल्याचा आरोप केला.

गुन्हा दाखल मात्र कारवाई नाही

या प्रकरणातील रुग्णाच्या आरोपी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली नाही, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. या आरोपींवर कायदेशीर कारवाई केली नाही, तर सर्व डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

लातुरात टोळक्याना केली डॉक्टरांना मारहाण

दरम्यान, लातूर शहरातील सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही दहा ते बारा जणांनी धुडगूस घालत डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ही घटना समोर आली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच आमचा रुग्ण दगावला, असा आरोप करत टोळक्यांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT