Dilip Walse Patil called on Chhatrapati Sambhaji Maharaj Dainik gomantak
महाराष्ट्र

'तेव्हाच मी जागा सोडणार...' गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आंदोलनस्थळी

वर्षा येथील बैठकीत काही मुद्दे चर्चेला घेण्यात आले आहेत त्याचंही आम्ही स्वागत करतो. पण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही.

दैनिक गोमन्तक

मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आज त्यांच्या भेटीला सरकारच्या वतिने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गेले होते. या भेटीवेळी संभाजीराजेंनी यांनी म्हटले की, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. वर्षा येथील बैठकीत काही मुद्दे चर्चेला घेण्यात आले आहेत त्याचंही आम्ही स्वागत करतो. पण आमचे हे 6 मुद्दे देखील लवकरात लवकर निकाली निघाले पाहिजेत. साहेब स्वत: त्या सर्व आंदोलना वर लक्ष ठेवून आहेत. (Dilip Walse Patil called on Chhatrapati Sambhaji Maharaj)

पुढे बोलतांना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मागे मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसात प्रश्नमार्गी लावू असे म्हटले होते, मात आजूनही त्या मागण्या मान्य झाल्या नाही. त्यांच्या खात्याशी संबधित विषयांवर ते आता स्वत: लक्ष घालणार आहेत. चर्चेला आता सुरूवात झाली आहे. जे काही निर्णय होणार आहेत ते लेखी स्वरुपात व्हावेत. माझी अपेक्षा नाही की, तुम्ही काही बोलावं. पण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही, असा निर्धारही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्ही याठिकाणी कुठलाही पक्ष घेऊन आलेलो नाही. आंदोलनात सहभागी झालेले सर्व स्व-इच्छेने आलेले आहेत. आम्ही कुणाचीही सुपारी घेऊन आलेलो नाही. सरकारला वेळ देऊ चर्चेतून मार्ग काढू देऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी गृहमंत्री (Home Minister) वळसे पाटील यांनी म्हटलंय की, संभाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे चर्चेतील सर्व मुद्यांच्या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न कसे मार्गी लागतील असा प्रयत्न करीन. आपण ही सहकार्य करावे, अशी विनंती ही त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Viral Video: याला म्हणतात खरी जिद्द! हात नसतानाही पायाने बाईक चालवून त्याने नियतीलाच आव्हान दिलं, पठ्ठ्याचा जोश पाहून सर्वच हैराण

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

SCROLL FOR NEXT